कृपया प्रतीक्षा करा...

समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र

विश्वस्त संख्या नोंदणी क्रमांक.F २३५९१/ मुंबई
"सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक"
मैत्रेय (समरसता साहित्य परिषदेचा ब्लॉग)
मुख्यपृष्ठ ब्लॉग समरसतेच्या निळ्या नभावर नवीन लेणी कोरुया…
समरसतेच्या निळ्या नभावर नवीन लेणी कोरुया…
लेखक : सुनील ढेंगळे
दिनांक : ६ फेब्रुवारी २०२१

समरसतेच्या निळ्या नभावर नवीन लेणी कोरुया…

मानव्याच्या उत्थानाचे स्वप्न भीमाचे पूर्ण करु या।
समता ममता बंधुत्वावर राष्ट्र वैभवी उभवू या।।ध्रु।।

समरसतेचा भाव मनांतील
प्रकटु अपुल्या कर्तृत्वातून ।
वंचित शोषित आत्मजनांचे
पुसूनी टाकू दुखःद क्रंदन।।
एकत्वाच्या संस्काराने जन जन अवघे जोडू या ।।१।।
समता ममता बंधुत्वावर राष्ट्र वैभवी उभवू या।।

संविधान ही ढाल आमुची।
हातांमध्ये मम भिमाची ।।
कशास भीती कलिकाळाची?
तलवार तळपते प्रज्ञेची ।।
धम्मत्वाच्या सुत्रामधुनी विश्व हे अवघे जोडु या ।।२।।
समता ममता बंधुत्वावर राष्ट्र वैभवी उभवू या।।

जातीयतेच्या भिंती तोडूनी
प्रचिती घेऊन एकत्वाची ।
आत्मदिपाचा प्रकाश लावू
गाणी गाऊन मांगल्याची।।
समरसतेच्या निळ्या नभावर नवीन लेणी कोरुया।।३।।
समता ममता बंधुत्वावर राष्ट्र वैभवी उभवू या।।

समतेचा संंस्कार झरावा।
ममतेचा व्यवहार घडावा।।
अबोल दबल्या आर्त स्वरांना
मुक्तीपथाचा मार्ग दिसावा।।
नवउर्मीच्या उन्मेषाला उधाणतेचा ध्यास देऊ या।।४।।
समता ममता बंधुत्वावर राष्ट्र वैभवी उभवू या।।