कृपया प्रतीक्षा करा...

समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र

विश्वस्त संख्या नोंदणी क्रमांक.F २३५९१/ मुंबई
"सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक"
मैत्रेय (समरसता साहित्य परिषदेचा ब्लॉग)
उपक्रम

साहित्यातून समरस समाज निर्मितीसाठी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम

समरसता साहित्य परिषदेच्या काही ठळक उपक्रमांविषयी..

नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन

नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन

नांदेड येथे २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या २०व्या समरसता साहित्य संमेलनाला साहित्यिक, कवी, विचारवंत व रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘नव्वदोत्तर साहित्य आणि समरसता’ या विषयावर आधारित संमेलनात परिसंवाद, मुलाखती, कविसंमेलन, गझल मंच व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सामाजिक समता, समरसता आणि मूल्याधिष्ठित साहित्यनिर्मितीवर विविध मान्यवरांनी विचार मांडले. भव्य ग्रंथदिंडी व विविध साहित्यिक उपक्रमांमुळे नांदेडमध्ये साहित्यिक वातावरण निर्माण झाले.

२ व ३ ऑगस्ट २०२५
निगडी येथे ‘साहित्यिक संवाद’ कार्यक्रम

निगडी येथे ‘साहित्यिक संवाद’ कार्यक्रम

निगडी येथे समरसता साहित्य परिषद व संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहित्यिक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी साहित्य हे समाजाला दिशा देणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. साहित्यिकांनी समाजातील वास्तव मांडत नव्या पिढीला विचारांची दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

२०२५
पहिले समरसता लोककला संमेलन

पहिले समरसता लोककला संमेलन

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या पहिल्या समरसता लोककला संमेलनात महाराष्ट्रभरातील एक हजारांहून अधिक लोककलावंतांनी सहभाग घेतला. लोककलांच्या जतन, संवर्धन व विकासासाठी स्वतंत्र लोककला विद्यापीठाची स्थापना करण्यासह सात महत्त्वपूर्ण ठरावांबाबत चर्चा करण्यात आली. विविध लोककलांचे बहारदार सादरीकरण, लोककलावंतांच्या मुलाखती आणि कविसंमेलनाने संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोककलावंतांच्या सहभागाने या भव्य सांस्कृतिक सोहळ्याची यशस्वी सांगता झाली.

२०२५